१० वी व १२ वीच्या दीड हजार गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव..

Share News

नाशिक जिल्हा क्लासेस संचालक संघटना व संदीप युनिव्हर्सिटी यांचा संयुक्त उपक्रम!

नाशिक : येथील नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना व उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य “संदीप युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने, येत्या जुनच्या दुसऱ्या आठवड्यात, शहर व जिल्ह्यातील, प्रत्येक क्लासेसमधील, १० वी व १२ वीला उत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या प्रत्येक क्लासमधील पहिल्या आलेल्या दहा याप्रमाणे जवळपास दीड हजार विद्यार्थ्यांचा गुणगौरव व पारितोषिक वितरण समारंभ, संदीप युनिव्हर्सिटीच्या कँपसमध्ये होणार आहे.

या सोहळ्यातच, क्लासेस क्षेत्रात व सामाजिक जीवनात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गुणवंत क्लासेस शिक्षकांना ” दी बेस्ट कोचिंग टिचर्स अवॉर्ड ” प्रदान करुन संघटना व विद्यापीठातर्फे सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे व संदीप युनिव्हर्सिटीचे प्रमुख संदीप झा यांनी दिली. क्लासेस क्षेत्रात किमान दहा वर्षे अध्यापनकार्य करणाऱ्या व कोणत्याही शाळा महाविद्यालयात नोकरीला नसणाऱ्या आजीवन सभासद क्लासेससंचालक यासाठी आपले प्रस्ताव, येत्या २० मे पर्यंत संघटनेचे उपाध्यक्ष अशोक देशपांडे (9881051972), कार्याध्यक्ष सचिन जाधव (7774848245), खजिनदार, योगेश पंचाक्षरी (9011060690) किंवा सांस्कृतिकप्रमुख पवन जोशी (9373909817) यांच्याकडे या क्रमांकावर पाठवू शकतात, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!