महिंद्रा ऐसेल्लो कंपनीकडून मुकणे ग्रामपंचायतीसाठी घंटागाडीचे लोकार्पण

घोटी बाजार समितीचे माजी संचालक विष्णु पाटील राव ग्रामपंचायत पदाधिकारी व अशोक राव यांच्या पाठपुराव्याला यश

प्रभाकर आवारी,
मुकणे (प्रतिनिधी): गोंदे औद्योगिक वसाहतीमधील महिंद्रा ऐसेल्लो कंपनीकडून मुकणे ग्रामपंचायतीसाठी देण्यात आलेल्या घंटागाडीचे लोकार्पण कंपनी व्यवस्थापनाचे व्यवस्थापक सुनील तिडके, संतोष दुसाने, कुज्जी श्रीवास्तव आदींसह घोटी बाजार समितीचे माजी सभापती गणपत पाटील राव, माजी संचालक विष्णु पाटील राव, चंद्रभान बोराडे, अशोक राव आदींसह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले की, गावच्या विकासासाठी केवळ शासनाच्या निधीवर अवलंबुन न राहता उद्योजक, कारखानदार, सामाजिक संस्था यांच्याकडून पाठपुरावा करीत निधी आणुन विकास साधण्याचे काम घोटी बाजार समितीचे माजी संचालक तथा मुकणे गावचे माजी सरपंच विष्णु पाटील राव यांनी केले असल्याचे सांगितले. यावेळी चंद्रभान बोराडे, संतोष दुसाने, संजय मोरे, प्रवीण साबळे आदींनी मनोगत व्यक्त केले.

विष्णु पाटील राव यांच्यासह ग्रामपंचायत सरपंच हिरामण राव, उपसरपंच भास्कर राव, सामाजिक कार्यकर्ते अशोक राव आदींनी सहकाऱ्यांना बरोबर घेत गावात कारखानदारांच्या मदतीने सभामंडप, सुसज्ज अंगणवाडी, शालेय विद्यार्थ्यांसाठी दोन सुलभ शौचालय, शाळेसाठी सिमेंटकंपाउड, जिंदाल कंपनीकडून पाणी पुरवठा योजना आदी मोठं मोठे कामे केली आहेत. आता महिंद्रा ऐसेल्लो कंपनीकडून मुकणे गावात स्वछता रहावी या उद्देशाने गावातील ओला सुका कचरा वाहतूक करण्यासाठी घंटागाडी दिली असुन तिचे लोकार्पणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कंपनी व्यवस्थापणाने यावेळी दिलेल्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी संजय मोरे, संतोष जाधव, दिलीप रोडे, सोसायटी व्हाईस चेअरमन काळु आवारी, पोपट राव, संचालक गणेश राव, गजिराम राव, ज्ञानेश्वर राव, सुरेश आवारी, मनोहर आवारी, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ राव, अनिल राव, निवृत्ती राव, तुकाराम राव, निलेश राव, गणेश राव, नारायण गोवर्धने, ग्रामसेवक उमेश खैरनार, माजी चेअरमन रामनाथ राव, तुकाराम वेल्हाळ, सोमनाथ साबळे, विष्णु वेल्हाळ, पोपट वेल्हाळ, किसन बोराडे, संपत गोवर्धने, भिमा शिरसाट आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर आवारी यांनी तर ग्रामसेवक उमेश खैरनार यांनी आभार मानले.

महिंद्रा ऐसेल्लो कंपनीकडून मुकणे ग्रामपंचायतीसाठी वेळोवेळी आवश्यक त्या विकास कामांसाठी मदत करून गावच्या विकासासाठी योगदान दिले असुन आता गावच्या स्वच्छतेसाठी देण्यात आलेल्या घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले. इतर कंपन्यांनीही मोठमोठे कामे दिले असुन गावच्या विकासात मोठी भर पडली आहे. महिंद्रा ऐसेल्लो कंपनी व्यवस्थापनाचे व्यवस्थापक सुनील तिडके, संतोष दुसाने, कुज्जी श्रीवास्तव यांचे मनस्वी आभार
विष्णु पाटील राव,                                        माजी सरपंच तथा संचालक घोटी बाजार समिती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!