नाशिक (प्रतिनिधी): विधानसभर निवडणुकीत लाक्या बहिणींनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडत मतदानाचा हक्क बजावला. २०१९ च्या तुलनेत यंदा महिला मतदानाच्या टक्केवारीत १०.११ ने घसघसशीत वाढ झाली आहे. त्यात नांदगाव मतदारसंसघात सर्वाधिक १३ तर देवळालीत १२.०८ टक्के महिला मतदारांचे प्रमाण वाढले आहे. मतदानातील लाडक्या बहिणींचा हा उत्साह सत्ताधारी महायुतीच्या पारड्यात मतांचे दान टाकतो की, महाविकास आघाडीला साथ देत परिवर्तन घडवतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
विधानसभेच्या पंधरा जागांसाठी जिल्ह्यात शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यात ६९.१२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंदिस्त केले. आता अवघ्या जिल्ह्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे. महिला मतदारांचा वाढलेला टक्का हे यंदाच्या निवडणूकीचे वैशिष्टय ठरले. यंदाच्या निवडणुकीच्या प्रचारात महायुतीकडून लाडकी बहीण योजना, एसटी बसमध्ये तिकिटात ५० टक्के सवलत तसेच ‘बटेंगे तो कटेंगे’ यासारखे फॅक्टर प्रभावीपणे मांडण्यात आले. विरोधातील महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर महालक्ष्मी योजनेत ३ हजार रुपये मानधन, एसटीचा शंभर टक्के मोफत बसप्रवास, महिला सुरक्षितता यासारख्या प्रभावी मुद्यांचा समावेश होता.
जिल्ह्यात २४ लाख ४६ हजार ९६८ महिला मतदारांची नोंदणी झाली होती. त्यापैकी १६ लाख ५६ हजार ८२९ महिलांनी राबाहेर पडत मतदान केले असून हे प्रमाण ६७.७१ टक्के इतके आहे. २०१९ सोबत तुलना केल्यास यंदा महिला मतदानाचा टक्का १०.११ टक्यांनी वाढला आहे.
विधानसभेची यंदाची निवडणूक विविध मुद्यांमुळे खºया अर्थाने वेगळी ठरली. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदारांचा उत्साहदेखील अधिक होता. जिल्ह्यात २६ लाख १४ हजार ६९ पैकी १८ लाख ४१ हजार ३८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, हे प्रमाण ७०.४४ टक्के आहे. २०१९ शी तुलना केल्यास पुरुषांच्या मतदानाच्या टक्यात ५.७४ टक्के वाढ झाली आहे. त्याचवेळी महिला मतदानाचा यंदाचा वाढीव टक्का हा पुरुषांच्या तुलनेत दुपाहणे आहे.