कांदा दरात झाली घसरण; निर्यात शुल्क रद्द करण्याची होतेय मागणी!

नाशिक (प्रतिनिधी): लासलगाव येथील बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने दरात मागील आठ दिवसात तब्बल ५० टक्के घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला असून निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी होत आहे. बुधवारी (दि. १८) लासलगाव बाजार समितीत ३० हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल कमाल २८०१ रुपये, किमान ९०० हजार रुपये तर सरासरी १९०० रुपये दर मिळाला. १० डिसेंबर रोजी याच लाल कांद्याला जास्तीतजास्त ५,२०० रुपये, कमीतकमी १,१०० हजार रुपये तर सरासरी ३,८०० रुपये दर मिळाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!