नाशिक (प्रतिनिधी): नायलॉन मांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगताना आढळून आल्याने चांदवड पोलिसांनी दोघांविरुद्ध कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५५०० रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे ११ रिळ जप्त केले आहेत. राज्यात बंदी असलेल्या घातक नायलॉन मांजाविरोधात पोलिसांकडून सर्वत्र मोहीम राबविली जात आहे. येथील हनुमाननगर परिसरात नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तेथे छापा टाकला. यावेळी विनापरवाना विक्रीसाठी नायलॉन मांजा कब्जात बाळगताना आढळून आल्याने पोलिसांनी ओमकार शेवाळे, समी कुरेशी (रा. वरचे गाव, चांदवड) यांच्याकडून ५५०० रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे ११ रिळ जप्त केले. याबाबत पोलीस कर्मचारी शिवनाथ शेळके यांच्या फिर्यादीवरून चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस नाईक सुनील जाधव करीत आहेत.
Related Posts
विहिरीत कार कोसळून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू; नाशिक हादरले
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. शुक्रवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास एक…
आरोग्य विद्यापीठात दीड कोटींची फसवणूक उघड
कक्ष अधिका-यासह तिघांवर गुन्हा दाखल नाशिक (प्रतिनीधी): महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक शुल्कातील तब्बल १ कोटी…
शनिवारी नाशिकचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ नाशिक:स्मार्ट सिटी अभियानांतर्गत फ्लोमिटर बसवणे तसेच जलवाहिन्यांच्या तातडीच्या दुरुस्ती कामांसाठी शनिवार, २० डिसेंबर २०२५ रोजी नाशिक शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा…
