सायंकाळी सहा वाजता परशुराम सायखेडकर नाट्यगृह लतादीदींच्या लोकप्रिय गाण्यांमधून सुरांजली!
नाशिक (प्रतिनिधी): महान पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांची शनिवारी २८ सप्टेंबर रोजी जयंती आहे. त्यानिमित्त अफलातून म्युझिक लव्हर्स व संतोष फासाटे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुरसम्राज्ञी लता’ या हिंदी चित्रपट गीतांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. विनामूल्य असलेली ही मैफिल संध्याकाळी सहा वाजता परशुराम सायखेडकर नाट्यगृह नाशिक येथे रंगणार आहे. यावेळी लतादीदींच्या लोकप्रिय गाण्यांमधून सुरांजली अर्पण करण्यात येईल.
या कार्यक्रमामध्ये नाशिकमधील सुप्रसिद्ध गायिका नमिता राजहंस, मृणाली मालपाठक, सुरभी गौड, प्रियंका कोठावदे, सीमा जाधव, डॉ.विशाखा जगताप, अर्चना सोनवणे, अलिषा निमोणकर तसेच या गायिकांना नाशिकमधील सहा सुप्रसिद्ध गायक हरीषभाई ठक्कर, उमेश मालवी, मनोज पळसकर, डी.एम. बोरसे, अविनाश देवरुखकर, विनायक मेदगे यांची साथसंगत लाभणार आहे. या कार्यक्रमांमध्ये सुपरहिट गीतांबरोबरच लतादीदी यांच्या आयुष्यातल्या अनेक पैलू व घडामोडी उलगडून सांगण्यात येणार आहेत. संकल्पना, निर्मिती व सूत्रसंचलन संतोष फासाटे यांचे असून, आयोजक हरीषभाई ठक्कर हे आहेत. या मैफिलीसाठी रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.