वणी (प्रतिनिधी): वणी येथे बेस्ट अचिवर्स स्कुल मधील चिमुरड्यांनी अनाथाश्रमातील मुलांना फराळ, मिठाई व भेटवस्तु देत त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करुन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
वणी येथील बेस्ट अचिवर्स स्कुलच्या वतीने प्रथम सत्राच्या अखेरच्या दिवशी अनाथाश्रमातील मुलांना पाचारण करण्यात आले होते. दरम्यान सर्व विद्यार्थी व शिक्षकांच्या वतीने मुलांना फराळ भरवीण्यात आले. तसेच ड्रेस, फळे व शालोपयोगी साहित्यासह अन्य दैनंदीन वापराचे साहित्य भेट म्हणुन देण्यात येऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या उपक्रमातुन विद्यार्थ्यांंना समानता व एकता ह्या मुल्यांची शिकवण देतांना त्यांच्यात समाजातील सर्व घटकांप्रती संवेदनशीलता ह्या गुणांची रुजवात करण्याचा मानस असल्याचे आयोजकांनी सांगीतले. यावेळी प्रांजल वडनेरे, शोभा मोरे, गायत्री पवार आदी शिक्षीकांसह पालक व विद्यार्थी उपस्थीत होते.