वणी (प्रतिनिधी): कसबे वणी येथील इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की भारत मधुकर वाघमारे (वय: ४२) रा. इंदिरानगर, कसबे वणी, ता. दिंडोरी, जि. नाशिक या व्यक्तीने सकाळी सहा वाजेच्या पूर्वी केव्हातरी राहत्या घरात अडगाईला नायलॉनच्या दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबर मयताचा भाऊ योगेश मधुकर वाघमारे वय ४०,रा. इंदिरानगर, कसबे वणी, ता. दिंडोरी जि. नाशिक यांनी वणी पोलिसांत दिली. त्यास वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. वणी पोलिसांत याबाबत आकस्मात मृत्युची नोंद केली असून अधिक तपास स.पो.नि. सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.देशमुख करीत आहे.
Related Posts
इथेनॉल प्रोजेक्टच्या कर्जाच्या आमिषाने नाशिकच्या दाम्पत्यास तब्बल ९४ लाखांचा गंडा!
नाशिक (प्रतिनिधी): इथेनॉल प्रोजेक्टसाठी दोनशे कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी शहरातील दाम्पत्यास तब्बल ९४ लाख रुपयांना गंडविल्याचा…
सिन्नर येथे दुकानात शिरून चाकूने वार करत केला गोळीबार!
सिन्नर (प्रतिनिधी): दुकानात शिरून एकावर चाकूने सपासप वार करीत, गावठी कट्ट्याने गोळीबार केल्याची घटना सिन्नर येथील वावी वेस परिसरात बुधवारी (दि.…
तीनवर्षीय चिमुकलीवर अत्याचार करत दगडाने ठेचून केली हत्या!
मालेगाव तालुक्यातील संतापजनक घटना : मुख्यमंत्र्यांनी ही घेतली दखल! मालेगाव (प्रतिनिधी): डोंगराळे येथून रविवारी (दि. १६) तीनवर्षीय बालिका बेपत्ता झाली.…
