कंत्राटी मलेरिया कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; कामगार उपआयुक्तांकडे धाव

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी मलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्यांकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनने केला आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेतर्फे कामगार उपआयुक्तांकडे निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. संघटनेने यापूर्वी दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी संबंधित मागण्यांसाठी निवेदन दिले होते. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांची अद्ययावत सेवाज्येष्ठता यादी जाहीर करून सेवाज्येष्ठतेनुसार कायम नियुक्ती देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच, दरवर्षी देण्यात येणारा गणवेश योग्य पद्धतीने न देता निकृष्ट दर्जाचे रेडीमेड टी-शर्ट दिले जात असल्याची तक्रारही करण्यात आली आहे. याऐवजी कापड देऊन शिवणकामाचा खर्च देण्याची मागणी संघटनेने केली आहे. याशिवाय, प्रत्येक विभागात कंत्राटी मलेरिया कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी किमान दोन सुपरवायझर नियुक्त करण्याची मागणीही करण्यात आली आहे. रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने या सर्व मागण्यांवर तातडीने कार्यवाही करून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावेळी जिल्हा प्रमुख तथा महानगर प्रमुख संतोष भाऊ वाघ यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व सदस्य  सागर पंडित, अमोल रामनाथ अवचिते, सुनील हिरामण साळवे, मोसीन रौफ शेख, सागर अशोक आल्हाट, उमेश रामदास मांडवे, गौतम सोमनाथ शिरतार, राजू अशोक राठोड, संदीप फकिरा राऊत,  राहुल निवृत्ती गायकवाड, अफजल जाविद शेख, दशरथ जगणं पारधी, हरीश वाल्मिक कर्डीले, मिलिंद सुरेश साळवे, गौतम भास्कर पंडित, गणेश जगताप, वासिफ शेख, निलेश कांबळे, प्रमोद पवार, रोहित पवार, गहिनीनाथ पाटील, उमेश रामराजे, प्रशांत खैरनार, गणेश खैरनार, अनिरुद्ध जाधव, राजू अहिरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!