नाशिक (प्रतिनिधी): गौतमी राजस परांजपे उर्फ गौतमी सुधीर देशमुख, वैशाली सुधीर देशमुख, गायत्री सुधीर देशमुख (सर्व रा. मुंबई) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. नाशिकरोड कौटुंबिक न्यायालयाचे कर्मचारी गुणवंत कोल्हे यांच्या फिर्यादीनुसार, संशयित गौतमी परांजपे उर्फ गौतमी देशमुख यांच्या फारकतीचा दावा कौठुंबिक न्यायालयात सुरू आहे.
बुधवारी (ता.४) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास न्यायालयीन कामकाज सुरू असताना, संशयितांना पुढील तारिख देण्यात आली. यामुळे नाराज झालेल्या संशयित गौतमी, तिची आई व बहिणीने न्यायालयात आरडाओरडा करीत गोंधळ घातला. त्यावेळी न्यायधीश श्रीमती रेखा पांढरे या त्यांच्या दालनाकडे जात असताना संशयितांच्या त्याच्या दालनाकडे धाव घेत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

Very happy with proper News are update in this paper.
All the best