पुन्हा एकदा मालेगावी चड्डी, बनियान गॅगचा धुमाकूळ!

मालेगाव (प्रतिनिधी): चोरी करण्यासाठी चोरटे काय शक्ल लढवतील हे सांगता येत नाही. त्यात मालेगाव शहरात चोरी करणारे संशयित आरोपी प्रत्येकवेळी वेगवेगळी शक्कल लढवित असतात. गेल्या आठवड्यात मालेगाव शहरात गाऊन गॅग सक्रीय झाली. त्यांनी महिलांचे कपडे परिधान करुन महिलांच्या घोळक्यात घूसून दागिने लंपास केले होते. या प्रकरणाचा शोध लागलेला नसतांना आता मालेगाव शहरात पुन्हा एकदा चड्डी बनियान गॅँगने धुमाकूळ घातला आहे. बुधवार (दि.४) रोजी टेहरे चौफुली परिसरात तब्बल सहा दुकाने फोडून या गॅँगने चोरी केल्याची घटना घडली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून मालेगाव शहरतरातील किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहराबाहेर असलेल्या टेहरे चौफुलीसह पसिरातील मनमाड चौफुली भागातील व्यापारी सुंकलात बुधवार (दि.४) रोजी अज्ञात चोरट्यांच्या टोळीने फर्टीलायझर, वारय, हार्डवेअर, इसार पंप, अन्नपुर्णा दुकान, पाणीजार विक्रीचे दुकान असे एकूण सहा दुकानात घरफोडी केली आहे. या घरफोडीत लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची चर्चा असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान मालेगाव शहर व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. विविध स्वरुपाच्या टोळी शहरात सक्रीय झाल्याने या चोरट्यांना अटक करण्यासाठी पोलीस त्यांच्या मागावर आहेत. मात्र तरीदेखील शहर व परिसरातील विविध ठिकाणी चोरटे त्यांचे लक्ष्य साध्य करीत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
या गॅँगमधील चोरटे हे सीसीटीव्ही कॅमेरात आपल्या कपड्यांवरुन आपली ओळख पटू नये, यासाठी केवळ बनियान आणि हाफ पॅन्ट परिधान करुन संपूर्ण टोळीतील सदस्य गुन्हेगारी करतात. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज मिळून देखील त्यांचा शोध घेण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर उभे राहते.
जाहिरातीसाठी संपर्क: 9922900815; 9822262885

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!