नाशिक (प्रतिनिधी): जिल्हाधिकाऱ्यांनाच ऑनलाइन फसवण्याचा डाव, अपघात झाल्याचा मेसेज; संशयिताला अटक करण्यात आली असून याबाबत घटनाक्रम असा, मंगळवारी (दि. 25) दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी शर्मा यांच्या भ्रमणध्वनीवर शालेय विद्यार्थ्यांच्या बस अपघाताचा संदेश आला. संदेशात नमूद क्रमांकावर (9597356640, पाटील) संपर्क साधला असता, घाटकोपर येथील विद्यार्थ्यांची बस मुंबई नाका येथे अपघातग्रस्त झाल्याची आणि त्यात चौघांचा मृत्यू, तर 15 जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच परतीच्या प्रवासासाठी मदतीची आवश्यकता असल्याचेही सांगण्यात आले. तत्काळ कृती करत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार निवासी उपजिल्हाधिकारी वाघ यांनी नायब तहसीलदारांना घटनास्थळी जाण्यास सांगितले. आपत्ती व्यवस्थापन शाखेने शहर पोलिस नियंत्रण कक्ष आणि पोलिस निरीक्षक, मुंबई नाका यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. मात्र, नाशिक परिघात सकाळी 8 ते रात्री 12 या कालावधीत असा कोणताही अपघात झालेला नसल्याचे स्पष्ट झाले.
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना भ्रमणध्वनीवर प्राप्त झाला. मात्र, चौकशीत हा मेसेज फसवणुकीसाठी पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तातडीने तपास करून रविकांत मधुकर फसाळे या संशयिताला पालघरमधून ४८ तासांत अटक केली.
