दीड वर्षापासून गुंगारा देणारा सराईताला देवळाली कॅम्पात अटक!

नाशिक (प्रतिनिधी): प्राणघातक हल्यात तब्बल दीड वर्षापासून गुंगारा देणा-या सराईतास देवळाली कॅम्प भागातून बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. संशयिताने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने वास्को चौकात धारदार शस्त्राने दोघांवर हल्ला केला होता. मात्र तो घटनेपासून पसार झाला होता. शहर गुुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने त्याला ताब्यात घेत नाशिकरोड पोलिसांच्या स्वाधिन केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशिल उर्फ गोरख रामभुल बेद (वय ३७, रा. पार्क अव्हेन्यू, भारत गॅस गोडावून समोर, देवळाली कॅम्प) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पथकाचे अंमलदार प्रविण चव्हाण व गणेश भागवत यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरातील संजय जाधव नामक रिक्षाचालक पोलीस वाहन अथवा कर्मचाºयांना बघताच संशयास्पद हलचाली करीत असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार दोन दिवस रेल्वेस्टेशन व उपनगर परिसरात सापळा लावण्यात आला. मात्र संशयित पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर गुरूवारी (दि. १३) तो देवळाली कॅम्प भागात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत त्याच्या मुसक्या आवळल्या असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. पथकातील कर्मचाºयांनी त्याला पोलिीस हिसका दाखवताच त्याने खरे नाव सांगितले. पोलीस रेकॉर्डवरील माहितीत त्याने दि. १९ जानेवारी २०२३ रोजी नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील वास्को चौकात संशयित शंकर चावरीया व शुभम चावरीया या साथीदारांसमवेत सोनसिंग शिकलकर व अनमोलसिंग शिकलकर यांच्यावर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दीड वर्षापासून तो या गुन्ह्यात फरार होता. पथकाने अटक करून त्यास नाशिकरोड पोलिसांच्या स्वाधिन केले आहे. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अमंलदार मलंग गुंजाळ, डी. के. पवार, विजय सूर्यवंशी, राजेश सावकार, सुनिल आडके, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, प्रविण चव्हाण, निवृत्ती माळी, अक्षय गांगुर्डे, गणेश नागरे, नितीन गौतम, सुवर्णा गायकवाड आदींच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!