कृष्णा पैठणे,
दिंडोरी (प्रतिनिधी): तालुक्यातील चारोसे येथे एका अडीच वर्षांच्या मुलीवर चुलत काकाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला या बाबत वणी पोलीस ठाण्यात पीडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वणी पोलीस ठाणे हद्दीत चारोसे गावात एका अडीच वर्षांची मुलगी गुरुवार दि.१३जुन रोजी सायंकाळी ०५:३० वाजता सुमारास घरासमोर खेळत असताना पिडीत मुलीचा चुलत काका याने तिला घरासमोर घेऊन गेला. मुलगी बराच वेळ झाले दिसत नाही म्हणून तिचे घरातील व आजू बाजूचे लोकांनी तिचा शोध घेत असताना रात्री ०८:०० वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी घरापासून काही अंतरावर उसाच्या शेतात संशयीत आरोपी रतन भास्कर गांगुर्डे, वय २१ वर्ष, राहणार- चारोसे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मुलीसह दिसुन आला. यावेळी अडीच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समजले याबाबत पीडीत मुलीच्या आईने वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सदर बाबत मुलीचे आईचा जबाब नोंद करून गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पोकसो कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून.पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे सपोनि.सुनिल पाटील करीत आहे.