वणी (प्रतिनिधी): साडेतीन शक्तीपीठापैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटन स्थळ असलेल्याश्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथे नाताळच्या सुट्ट्या, वर्ष समाप्ती आणि नूतन वर्ष प्रारंभ काळात भाविक भक्त नूतन संकल्प घेवून श्री भगवती अर्थात श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला गडावर येतात. त्यामुळे वर्षाच्या शेवटी व सुरवातीच्या कालावधीत श्रीक्षेत्री मोठ्या प्रमाणात राज्यासह परराज्यातून लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविकांना गर्दी विरहित व योग्य नियोजनासह सुलभ दर्शन उपलब्ध होणे दृष्टीने विश्वस्त मंडळ व कार्यालयीन प्रशासनाने पूर्वनियोजन करून श्री भगवती मंदिर हे रविवार, दि. २९/१२/२०२४ पासून गुरुवार, दि. ०२/०१/२०२५ रात्री ९.०० वाजे पावेतो भाविकांना दर्शनासाठी २४ तास प्रकारात खुले असणार आहे. दरम्यानच्या काळात घाटरस्ता आणि सेवासुविधा देखील पूर्ववत असेल. याची सर्व भाविक भक्तांनी योग्य ती नोंद घ्यावी. असे आवाहन विश्वस्त संस्थेचे विद्यमान विश्वस्त व कार्यालयीन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.