वणीत संताजी महाराज पुण्यतिथी निमीत्त आयोजीत पालखीचे भोई होण्याचा मान महिलांंना

वणी (प्रतिनिधी): वणी येथे संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमीत्त सप्ताहाचे आयोजन करण्यात येऊन ग्रंथदिंडीने सांगता करण्यात आली; दरम्याण पालखीचे भोई होण्याचा मान महिलांना देण्यात येऊन स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्यात आला.

तैलीक समाजाचे आराध्य दैवत तथा संत तुकोबारायांच्या गाथांचे लेखक संताजी जगनाडे महाराज यांची आज शनिवार दि. २८ रोजी पुण्यतिथी संपन्न झाली. सदर पुण्यतिथी निमीत्त महिला मंडळाच्या वतीने सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान राधा-कृष्ण मंदिर येथे हभप दत्ता महाराज जाधव यांचे गाधा पारायण करण्यात आले. तसेच हभप धर्माचार्य निवृत्तीनाथ महाराज रायते, खडकमाळेगावं यांच्या प्रनचनाने सप्ताहाची. सांगता करण्यात आली. तसेच आज शनिवार दि. २८ रोजी सकाळी राधा-कृष्ण मंदीर- संताजी मंगल कार्यालय – जगदंबा माता मंदिर अशा ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

सदर पालखीचे भोई होण्याचा मान महिला वर्गाला देऊन स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्यात आला.तसेच महिलांनी देखील एकाच रंगाचे वस्त्र परिधान करुन एकतेचा संदेश दिला. सदर दिंडीची सांगता विठ्ठल रुक्मीणी मंदिरात महा आरती व प्रसाद वाटपाने करण्यात आली. यावेळी जेष्ठ मार्गदर्शक पंढरीनाथ सोनवणे, अशोकराव कोकाटे, हिरामण सातपुते, माजी उपसरपंच मनोज शर्मा, गणेश देशमुख, तैलीक समाज वणी शहराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, उपाध्यक्ष सुरेश जाधव, शिवराम देवराई, दत्तात्रय सोणवणे, नंदलाल सोमवंशी, माधवराव देवराई, बबनराव कोकाटे, पुंजाराम सातपुते, पद्माकर पैठणे, किरण कोकाटे, संजय कोकाटे, मधुकर राऊत, बाळासाहेब पिंगळे, दत्तात्रेय पवार,, कचरदास करवंदे, निवृत्ती पवार, सुनील पैठणे, राजेंद्र जाधव, निंबा पैठणे, अनिल जाधव, कैलास पैठणे, मनोज कहाने, मनोज पैठणे, विजय गायकवाड, गणेश पिंगळे, भारत पैठणे, प्रवीण जाधव आदींसह तेली समाज बांधव व भगिणी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!