पंचवटी (प्रतिनिधी): पंचवटीत जयंती उत्सवात डीजेच्या आवाजाने एका तरुणाच्या नाकातोंडांतून अचानक रक्त येऊ लागल्याने त्यास तातडीने रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.
उपचारादरम्यान रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास नितीन यास वैद्यकीय अधिकारी वर्मा यांनी मयत घोषित केले. या दुर्घटनेने रणशिंगे कुटुंबीयांना धक्का बसला आहे. आहे. पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नितीन फकीरा रणशिंगे (२३, रा.फुलेनगर) असे मृत तरुणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. जयंती उत्सवाचा जल्लोष सुरू असताना पेठरोड येथे रविवारी (दि.१३) रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत होती. नितीन बाजूला उभा होता. अचानक त्याला चक्कर यायाला लागले अन तो जमिनीवर कोसळला. ही बाब त्याचा भाऊ आनंद रणशिंगे यांच्या लक्षात आली. नितीन याच्या नाकातोंडातून रक्त वाहू लागले. त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले.
