नाशिक (प्रतिनिधी): खालीलपैकी कोणत्याही एका मार्गाने आपण हयातीचा दाखला सादर करू शकतो. आपले निवृत्तीवेतनधारक खाते असलेल्या बँकेच्या शाखेत जाऊन बँक अधिकाराच्या समक्ष हयात दाखल्याच्या यादीतील आपल्या नावासमोर स्वाक्षरी करावी. https://jeevanpraman.gov.in (जीवनप्रमाण) या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने हयात दाखला सादर करता येईल. हयातीचे प्रमाणपत्रावर बैंक अधिकारी किंवा राजपत्रित अधिकाऱ्याच्या समक्ष स्वाक्षरी करून जिल्हा कोषागार / उपकोषागार कार्यालयात सादर करता येईल. निवृत्ती वेतन धारक काही कारणानिमित्त परदेशात असल्यास तेथील भारतीय राजदूतामार्फत हयातीचा दाखला संबंधित जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करता येईल.
जेष्ठ नागरिकांना हयातीचा दाखला जमा करण्याची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत!
