नाशिक (प्रतिनिधी): निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सापडले लाखो रुपये. नक्की हे पैसे आले कसे व कोणाचा हा प्रश्न तर आहेच याचा ही खुलासा लवकरच होईल असा दावा पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आलेचे कळते.
याबाबत पोलिसांनी दिलेले सविस्तर वृत्त असे की, नाशिकच्या सातपूर परिसरातील नाकाबंदी दरम्यान सापडले 20 लाख 50 हजार तर , उपनगर परिसरातील घर झडतीत सापडले अकरा लाख. तसेच नाशिकच्या उपनगर परिसरात असलेल्या भालेराव मळा परिसरातील झोपडपट्टीत पैसे सापडल्याने खळबळ उडाली. घर झडतीत सापडलेल्या पैशातून 21 वर्षीय तरुणाला आणि नाकाबंदी दरम्यान कार मध्ये सापडलेल्या कारचालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात घेतल्याचे समजते. दरम्यान, नाशिकमध्ये नाशिक पोलिसांना तपासाच्या दरम्यान एकुण सापडले 31 लाख रुपये. पोलिसांना सापडलेल्या पैशाचा राजकीय व्यक्ती किंवा पक्षाशी संबंध आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरू असून लवकरच मोठा खुलासा होण्याची शक्यता?