सातपूर (प्रतिनिधी) : पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हवालदार रमेश सखाराम वाघमारे (वय ४४) शनिवारी रात्री सरकारी वसाहत स्नेहबंधन पार्क शरणपूर येथून निघाले असता त्यांना अचानक चक्कर आल्याने त्यांचा मृत्यू झाला. वाघमारे हे रात्रपाळीसाठी निघाले होते. त्याचवेळी पार्किं गमधील मोटरसायकल काढत असताना ते चक्कर येऊन पडले. यावेळी त्यांच्या डोक्यास मार लागून ते बेशुद्ध झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, वडील, भाऊ असा परिवार आहे. त्यांचे बंधू संजय वाघमारे पंचवटी पोलीस ठाण्यात हवालदार आहेत. त्यांच्या पार्थिवावर दिंडोरी तालुक्यातील नाळेगाव या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
Related Posts
उन्हाचा तडाखा झाला कमी तर थंडीचा जोर वाढणार!
नाशिक (प्रतिनिधी): गेल्या पाच दिवसांत शहरात तापमानाचा पारा पाच अंश सेल्सिअसने घसरला आहे. सोमवारी (दि. २१) किमान तापमान २२.४ अंश…
बागलाण मधील साल्हेर किल्याची युनेस्कोच्या टिमकडून हवाई पाहणी !
नाशिक (प्रतिनिधी): शिवशाहीचा साक्षीदार असलेल्या बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्याचे केंद्र सरकारने युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या २०२४-२५ वर्षाच्या प्राथमिक यादीत नामांकन…
घामाच्या थेंबांतून घडलेले स्वप्न साकारणारा पैलवान किशोर पवार; शरद फडोळ
भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावणाऱ्या पैलवान किशोर पवारचा केला नाशिकच्या नगरसेवकाने गुणगैरव! नाशिक (प्रतिनिधी): कठोर परिश्रम, अपार जिद्द आणि अखंड शिस्त…
