-
सगेसोयरे कायदा करा अन्यथा पुन्हा साखळी उपोषणे
-
नाशिकच्या सकल मराठा समाजावतीने पाठवले मुख्यमंत्र्यांना निवेदन!
नाशिक (प्रतिनिधी): मराठासमाजाला आरक्षण तसेच सगेसोयरे कायद्यासाठी उपोषणकर्ते मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाकडे राज्य शासन जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे, अन्न, पाणी व उपचार त्यागल्याने मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्या प्रकृतीची पूर्ण जबाबदारी राज्य शासनाची आहे. तातडीने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करुण शासनाने मनोज जरांगे यांचे उपोषण थांबवा, अश्या आशयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने निवेदन नाशिक जिल्हा सकल मराठा समाजावतीने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना देण्यात आले. यावेळी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्यांना पूर्ण वेळ भेटीसाठी प्रशासकीय अधिकारी नेमा अशी मागणी ही करण्यात आली.
मराठा समाजाला ओबीसी तून ५० टक्केच्या आत कायदेशीर आरक्षण द्यावे, तसेच सगेसोयरे आदिसूचनेचा कायदा करावा, यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे, अन्न पाणी व उपचाराचा पूर्ण त्याग करुण जरांगे पाटील यांची प्रकृती आज पाचव्या दिवशी चिंताजनक आहे. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्या ऐवजी राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे, हा सात कोटी मराठ्यांचा आवमान आहे. मुख्यमंत्री महोदय आपण आपल्या कर्तव्य विसरू नका, मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करा, व मनोज जरांगे पाटील यांची काळजी घ्या ही तुमचीच जबाबदारी असल्याच्या भावना सकल मराठा समाजावतिने करण्यात आल्या आहे.
दरम्यान यावेळी सकल मराठा समाजाचे मुख्य उपोषणकर्ते नाना बच्छाव यांनी सांगितले कि राज्य सरकारने मराठा आंदोलनाकडे सातत्याने दुर्लक्षच केले आहे, जे काही निर्णय घेतले ते टिकले नाही,मराठा आंदोलकांवर लाठीमार हा तर मोठा अन्याय अत्याचार होता, अजून किती अंत राज्य सरकार बघणार आता जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली तरी राज्य सरकार गंभीर नसेल,तर निवडून आलेले खासदार आमदार करतात काय?असा सवाल ही व्यक्त केला,मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यासाठी आम्ही अखेरपर्यंत लढू, प्रसंगी पुन्हा साखळी उपोषण करू,मात्र जरांगे पाटील यांची प्रकृती आमच्या साठी महत्वाची आहे,असे त्यांनी सांगितले.
यावेळी सकल मराठा समाजाचे उपोषण कर्ते नाना बच्छाव,जेष्ठ चंद्रकांत बनकर,प्रचार प्रमुख राम खुर्दळ,हिरामण नाना वाघ,प्रफुल्ल वाघ,संजय फडोळ, नितिन रोठे पा.राजेंद्र शेळके,समिर वडजे,योगेश नाटकर,अण्णा पिंपळे,रमेश खापरे,सुधाकर चांदवडे,राहुल ढोमसे, अविनाश वाळुंजे, रोहिणी उखाडे,अनिता गारुळे, शोभाताई सोनवणे,ज्ञानेश्वर सुरासे, निलेश ठुबे,गौरव गाजरे, श्रीराम निकम,बी आर कोशिरे, प्रल्हाद जाधव,विलास गडाख,बाळा साहेब गारुळे,विकास रसाळ,संदिप बऱ्हे, ज्ञानेश्वर कवडे महेंद्र बेहेरे, नितिन काळे, नितिन खैरणार, विक्रांत देशमुख,विजय पेलमहाले आदी उपस्थित होते.