विकास शेंडगे, घोटी (प्रतिनिधी): इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघ हा राखीव असल्याकारणाने या मतदारसंघात इच्छुकांची भर पडत आहे आमदार हिरामण खोसकर यांच्यासह माजी आमदार निर्मला गावित, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, माझी सभापती गोपाळ लहांगे हे उमेदवारी इच्छुक असताना माजी आमदार शिवराम झोले यांच्या कन्या शैला शिवराम झोले यांनीही आता इगतपुरी त्रंबकेश्वर मतदारसंघांमध्ये एन्ट्री केली आहे आगामी विधानसभामध्ये शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस कडून शैला झोले इच्छुक असून त्या उमेदवारी करणार आहेत. दरम्यान गत 2019 साली शैला झोले यांनी अपक्ष उमेदवारी लढवत ही निवडणूक लढवली होती. त्यामुळे या निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही निवडणूक लढवणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी माध्यमांना दिली आहे.
दरम्यान विकासाच्या मुद्यांवर ही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे इगतपुरी त्रंबकेश्वर मतदारसंघ आदिवासी मतदारसंघ असल्याने या मतदारसंघात गेल्या पन्नास वर्षापासून विकासात्मक काम होत नसून इथे रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित होत आहे धरण उशाला कोरड घशाला तालुक्याची परिस्थिती आहे मुंबईचा मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या इगतपुरी तालुक्याला हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे ही अत्यंत दुर्दैवी बाब असून इथला लोकप्रतिनिधी मात्र स्वतःचा विकास करण्यामध्ये व्यस्त आहे त्यामुळे आगामी विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी करून विकासाच्या बाबतीत इगतपुरी त्रंबकेश्वर मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने रोजगाराचा व पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे असे देखील यावेळी शैला झोले यांनी सांगितले. त्यामुळे इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघांमध्ये यंदाची निवडणूक ही चुरशीची होणार असून निर्णयाक निवडणूक होणार आहे.