पिण्याचे पाणी संभाळून वापरण्याचे मनपाचे आवाहन!
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात पाणी पुरवठा विभागातील विविध ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या तसेच उप वितरण वाहिन्यांची दुरुस्ती तसेच व्हॉलची दुरुस्ती, व्हॉल बदलणे इत्यादी देखभाल दुरुस्तीचे कामे तसेच गंगापुर धरण पंपीग स्टेशन येथील सिव्च यार्ड चेंज ओव्हर स्ट्रक्ररची कामे करणे पाणी पुरवठा सुरळीत होणेकामी हाती घेणे आवश्यक आहे. त्यामुळे गंगापुर धरण पंपिंग स्टेशन व मुकणे पंपिंग स्टेशन येथील पंपिंग बंद ठेवावे लागणार आहे परीणामी संपुर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा शनिवार दि. १३/०७/२०२४ रोजी सकाळी ९.०० वाजेपासुन पुर्ण दिवस होऊ शकणार नाही. तसेच रविवार दि. १४/ ०७/ ३०२४ रोजी सकाळचा संपुर्ण नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील पाणी कमी दाबाने होईल, याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे ही विनंती. असे आवाहन कार्यकारी अभियंता, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग (पाणी पुरवठा) नाशिक महानगरपालिका, नाशिक यांच्यावतीने करण्यात आले आहे.
