नाशिक (प्रतिनिधी): संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे उपस्थित राहणार आहे. त्यासाठी ठाकरे हे सहकु टूंब दि. १९ व २० रोजी नाशिक दौºयावर येत आहे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त त्र्यंबकश्वर ते पंढरपूरपर्यंत पायी दिंडी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी होतात. संत निवृत्तीनाथांच्या दिंडीला मानाचे स्थान असल्याने याच पालखीचे दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे सहकुटूंब येणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी महापौर अशोक मुर्तडक, प्रदेश उपअध्यक्ष सलीम शेख, शहर अध्यक्ष सुदामभाऊ कोंबडे, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम, जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार, माजी शहर अध्यक्ष दिलीप दातीर यांनी दिली आहे.
Related Posts
खरेदीविक्री संघाच्या चेअरमनपदी बाळा गव्हाणे यांची तर व्हाईस चेअरमनपदी भरत कातोरे यांची बिनविरोध निवड!
काही तरी वेगळे करण्याचे स्वप्न हाती असणाऱ्या युवकांना राजकारणात ही वेगळी संधी मिळाली तर ते नक्कीच यशस्वी होतात याचे जिवंत…
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचे आवाहन
राज्यात २३ जूनपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता नाशिक (प्रतिनिधी) : राज्यात २३ जूनपासून पावसाचा जोर वाढणार आहे. शेतक-यांनी मान्सूनच्या मंद…
वीरपित्याच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्वावर आठवडाभरात मुलाला मिळाली नोकरी!
नाशिक (प्रतिनिधी): सेवा बजावत असताना वीरमरण आलेल्या कर्मचा-याच्या वारसास अवघ्या आठ दिवसांच्या आत एक्साइज विभागाने अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घेतले…
