काही तरी वेगळे करण्याचे स्वप्न हाती असणाऱ्या युवकांना राजकारणात ही वेगळी संधी मिळाली तर ते नक्कीच यशस्वी होतात याचे जिवंत उदाहरण म्हणजे शिवसेनेचे युवानेते बाळा गव्हाणे हे होय. कृठलाही राजकीय वारसा नसतांना इगतपुरी तालुका खरेदी विक्री संघावर थेट चेअरमन पदी बसण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.
घोटी (प्रतिनिधी): इगतपुरी तालुक्यातील महत्वाचा समजला जाणाऱ्या खरेदीविक्री संघ, यांची निवडणूक नुकतीच पार झाली यात निवड बिनविरोध झाली असून संघाचे नेते अँड संदीप गुळवे, माजी सभापती ज्ञानेश्वर लहाने व माजी आमदार शिवराम झोले यांच्या नेतृत्वाखाली पार पडली आहे. यावेळी विहित वेळेत चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी केवळ एकमेव अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध घोषित कारण्यात आली. यावेळी चेअरमण पदासाठी प्रकाश (बाळा) त्र्यंबक गव्हाणे यांचा एकमेव अर्ज आला असून व्हाईस चेअरमन पदासाठी भरत कातोरे यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवड अविरोध घोषित करण्यात आली असून निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना सैंदाने यांनी घोषित केली. यावेळी सभागृहात माजी आमदार शिवराम झोले, सभापती सुनीता गुळवे, माजी सभापती ज्ञानेश्वर लहाने, माजी व्हाईस चेअरमन जयराम धान्डे, जेष्ठ संचालक सुनील जाधव, तालुकाप्रमुख देवीदास जाधव, अनिल तोकडे, अरुण गायकर, समाधान वारुंगसे, मोहन भोर, पांडुरंग खातळे, रमेश धांडे, संजय जाधव, आशा देवगिरे, भरत कातोरे, देवराम म्हसने, संजय खातळे, खण्डेरावं झणकर हे संचालक सभागृहात उपस्थित होते.
यावेळी शिवसेनेचे नेते निवृती जाधव, तालुकाध्यक्ष रमेश जाधव, माजी सभापती गोपाळ लहाणगे, उपसभापती शिवाजी शिरसाठ, भाऊसाहेब खातळे, दिलीप जाधव, भास्कर पोरजे, अनिता घारे, बाळासाहेब झोले, बाणेश्वर मालूनजकर, रामदास गव्हाणे, रावसाहेब कातोरे, पंडित कातोरे, पांडुरंग शिंदे, अँड उत्तम गव्हाणे, राजाराम गव्हाणे आदी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
