सख्या लहान्या भावाने मोठ्याला डिझेल टाकून पेटविले!

नाशिक (प्रतिनिधी): शेतीच्या किरकोळ वादातून शेजा-यांसह सख्खा भाऊ पक्का वैरी होतांना दिसत असून भावकीच्या वडिलोपार्जीत विहीरीच्या वादातून सख्या भावासह त्यांच्या कुटूंबियांनी ८० वर्षीय वृध्दास डिझेल टाकून पेटवून दिल्याची दुर्दवी घटना थर्डी सारोळे ता.निफाड येथे घडली. या घटनेत वृध्द ९५ टक्के भाजला असून, त्यांच्यावर जिल्हारूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कचेश्वर महादू नागरे असे गंभीर भाजलेल्या वृध्दाचे नाव आहे. थर्डी सारोळे येथील नागरे बंधूमध्ये वडीलोपार्जीत विहीरीवरून वाद आहे. वयोवृध्द कचेश्वर नागरे हे मंगळवारी (दि.९) आपल्या शेतातील घराजवळ साफसफाई करीत असताना ही घटना घडली. कचेश्वर नागरे यांचे कुटूंबिय घरात असल्याची संधी साधात अचानक हातात डिझेलचे डबके घेवून आलेल्या त्यांच्या धाकल्या भावासह भावजई व दोन पुतण्यांनी कचेश्वर यांच्या अंगावर डिझेल टाकून पेटवून दिले. काही समजण्याच्या आत घडलेल्या या घटनेनंतर कचेश्वर यांनी सैरभैर पळत आग विझविण्याचा प्रयत्न केला. वडिलांचा ओरडण्याचा आवाज आल्याने कुटूंबियाने घराबाहेर धाव घेतली मात्र तत्पूर्वीच संशयित नागरे कुटूंबिय पसार झाले होते. या घटनेत कचेश्वर नागरे गंभीर भाजल्याने मुलगा हनुमंत नागरे यांनी त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान वृध्द कचेश्वर नागरे ९५ टक्के भाजल्याने त्यांची प्रकृर्ती गंभीर असून या घटनेची माहिती मिळताच निफाड पोलीसांनी रूग्णालयात धाव घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!