भाऊजी ताई काय करतेय, ‘लाडक्या बहीणीं’चे अर्ज दाखल करण्यात व्यस्त आहे!

नाशिक जिल्ह्यातून १ लाख, १२ हजार ‘लाडक्या बहीणीं’चे अर्ज दाखल!

नाशिक (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी शहरांसोबतच ग्रामपातळीवरही विविध कार्यक्रमांची आखणी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली आहे. सदर योजनेतंर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका / अंगणवाडी सेविका, एनयूएलएम यांचे समूह संघटक (सीआरपी), मदत कक्ष प्रमुख व सीएमएम, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरुन घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी जिल्ह्याभरातून आत्तापर्यंत १ लाख १२ हजार ४६७ महिलांनी अर्ज केले आहे. नोंदणी केलेल्या अर्जामध्ये ३१ हजार ४५६ महिलांनी ऑफलाईन तर ८१ हजार ११ महिलांची ऑफलाईन अर्ज केले आहेत. वैयक्तिक व शासकीय यंत्रणांबाहेरील व्यक्ती व्यतिरिक्त ही संख्या आहे. प्राप्त अर्जांची छाननी सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

सध्या या योजनेतील कागदपत्रे जुळवाजुळव करण्यात ताई व्यस्त असल्याने सख्या भावाने फोन करत विचारलं, भाऊजी ताई काय करतेय, ‘लाडक्या बहीणीं’चे अर्ज दाखल करण्यात व्यस्त आहे? असे चित्र घरोघरी बघायला दिसतंय. तरी राज्य शासनाने या योजनेची व्याप्ती वाढविल्यामुळे अमलबजावणी अत्यंत सुलभ होणार असून अर्ज दाखल करणे सोपे होणार असल्याने अधिकाधिक लाभार्थी महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!