नाशिक (प्रतिनिधी): गरुडझेप प्रतिष्ठान विविध सामाजिक उपक्रम करत नासिक मध्ये एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे. गडकोट संवर्धन, गोदावरी स्वच्छता अभियान, बेटी बचाव बेटी पढाव अभियान व वाहतूक सुरक्षा व पर्यावरण रक्षा अभियान गेली 2300 दिवस सातत्यपूर्ण राबवत नवीन जागतिक विक्रम केला आहे.
25 मार्च 2018 पासून सातत्यपूर्ण हे अभियान सुरू आहे.याचे 16 जागतिक विक्रम झाले आहेत .ब्राहो इंटरनॅशनल व वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन यामध्ये नोंद झाली आहे. आज नाशिक मध्ये हेल्मेट चा वापर अनेक पटीने वाढला आहे . समाज वाहतूक सुरक्षा नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करत आहे. नाशिक अपघात शून्य करायचे असेल तर मोठ्या प्रमाणात जनजागर आवश्यक आहे. गेली 2300 दिवस गरुड झेप चे कार्यकर्ते – डॉ संदीप भानोसे, संकेत भानोसे, संगीता भानोसे, रेणू भानोसे , सौरव भंडारी, निखिल तेलगोटे , दर्शन चव्हाणके, सागर बोडके, अंजना प्रधान , अजिंक्य तरटे ,रवींद्र जोशी, मनोहर जोशी ,रवींद्र कुलकर्णी ,अमोल अहिरे , यश साबळे , मनीष बाविस्कर ,चंद्रकांत भानोसे. ट्राफिक पोलीस राजेंद्र साळवे व अशोक शिंदे तसेच हिरवांकुर फाउंडेशन तर्फे अध्यक्ष निलय बाबु शाह, दिलीप गुळवे, संजय पवार, चेतन बागमार, निशांत शाह, डॉ.ऋषभ गुंडेचा, राखी शाह, कु.दानवी लाकडे व इतर कार्यकर्ते अभियान यशस्वीरित्या राबवत आहेत. सातत्यपूर्ण 2300 दिवस एखाद्या अभियान राबवणे यासाठी चिकाटी, सकारात्मक विचार, संयम ध्येयनिश्चिती कार्य प्रेरणा व राष्ट्रभक्ती तसेच समाजाप्रती अतिउप्रेम आवश्यक आहेत. पुढील टार्गेट सातत्यपूर्ण तीन हजार दिवस करणार असे गरुड झेप चे अध्यक्ष संदीप भानोसे यांनी सांगितले.
