प्रभाकर आवारी,
मुकणे (प्रतिनिधी): नाशिक ग्रामीणचे पोलिस कर्मचारी राजेंद्र कांगणे यांची कन्या अक्षदा राजेंद्र कांगणे ही सीए परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली आहे. विशेष म्हणजे कुठलाही क्लास न लावता ३ वर्षे इंटरशीप करून लायब्ररीमध्ये अभ्यास करून तिने हे यश मिळवले आहे.
अक्षदा हीने इयत्ता १० वीच्या परीक्षेत ८९ टक्के, १२ वी कॉमर्स ७७ टक्के तर बी कॉमला ७७ टक्के गुणांनी उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे. सद्या कोणत्याही विषयासाठी महागडे क्लास लावण्याची सवय झाली असतांना पोलीस कर्मचारी राजेंद्र कांगणे यांची कन्या अक्षदा हिने सीए सारख्या कठीण अभ्यासक्रमासाठी कुठलाही क्लास न लावता स्वतःच्या जिद्दीने व हुशारीने केवळ लायब्ररीमध्ये अभ्यास करून
सीएच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले असुन तिच्या या यशाबद्दल वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव व वाडीवऱ्हे, घोटी व इगतपुरीच्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
