पोलिस निरीक्षक नंदन बगाडे यांच्यासह ८ पाेलिस अधिकारी, अंमलदार सेवानिवृत्त!
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहर पोलिस दलातील पोलिस निरीक्षक नंदन बगाडे यांच्यासह उपनिरीक्षक संभाजी निकुंभ, गजमल महाले, हसन पठाण, राजु जाधव, सहायक उपनिरीक्षक वसंत पांडव, हवालदार रंगनाथ सानप, छाया चौधरी, हे शासकीय नियमानुसार सेवाकाल संपल्याने निवृत्त झाले. निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस आयुक्त कार्यालयामार्फत सहकुटुंब सत्कार करण्यात आला. यावेळी उपआयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. पोलिस दलात कर्तव्य बजावतांना निवृत्त अधिकाऱ्यांनी केलेल्या कामांची माहिती देत असतांना अधिकारी भाऊक झाले होते.
