राज्यस्तरीय नारी शक्ती पुरस्काराच्या मानकरी ठरल्या हिरवांकुरच्या राखी शाह!

नाशिक (प्रतिनिधी): राज्यस्तरीय नारीशक्ति पुरस्कार हा ब्रेन ट्रेन एज्युकेशन फाउंडेशन व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वेदिक मॅथ अँड अबॅकस यांच्यातर्फे दिला जातो. हा अत्यंत सन्मान जनक पुरस्कार सोहळा रविवार दिनांक १४ जुलै रोजी गुरुदक्षिणा सभागृह, कॉलेज रोड येथे संपन्न झाला.

यामध्ये समाज व राष्ट्राप्रती अभिप्रेत राहून पर्यावरण सामाजिक शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य अशा विविध कार्यक्षेत्रात निःस्वार्थ सेवा देणाऱ्या आदर्श महिलांना याद्वारे सन्मानित करण्यात आले‌. यामध्ये पर्यावरणाप्रती अत्यंत समर्पित भावनेने राज्यातील सुमारे ५० पेक्षा जास्त ठिकाणी कार्य करणाऱ्या हिरवांकुर फाउंडेशनच्या फाउंडर मेंबर राखी शाह यांना सन्मानित करण्यात आले. पर्यावरणा प्रति समर्पित भावनेनी ओतप्रोत असलेल्या राखी शाह या जिद्द, चिकाटी, मेहनत व कुशल प्रशासक म्हणून ओळखल्या जातात. टिम हिरवांकुरच्या नारी शक्तीचा सन्मान म्हणजेच योग्यतेचा सन्मान असे उद्गार उपस्थितानी काढले व भरभरून आर्शिवाद दिले. हिरवांकुर म्हणजे स्वच्छ हरित व जलयुक्त पर्यावरणाचे संस्कार. या संस्थेद्वारा विद्यार्थी दशेतूनच हरितसंस्कार द्वारा “हर घर किसान” ही संकल्पना मोठ्या जोमाने तीन राज्यात कार्यरत आहे. या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून मा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.भारतीताई पवार, एम.आय.टी कॉलेजचे अध्यक्ष सुरेश आण्णा पाटील, आमदार सीमाताई हिरे, जेष्ठ लोकनेते दिनकरराव पाटील,
बालहक्क संरक्षण आरोग्याच्या सदस्या सायली पालखेडकर,
ब्रह्माकुमारी सन्मा. मनीषा दिदी इत्यादी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला मोठ्या उत्सवाचे स्वरूप आले होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कर्तुत्ववान महिलांना राज्यस्तरीय नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन निकुंभ नरेंद्रजी यांनी केले. याप्रसंगी हिरवांकुर परिवारातील राखी शाह, नलिनी शाह, ज्योती देवरे, प्रशांत देवरे, कल्पेश शाह, प्रत्यय देवरे, प्रत्युषा देवरे, वेलीना शाह उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!