जागा हो नाशिककर: गेल्या उन्हाळ्यात 35 डिग्री तर यावेळी 43 डिग्री तापमान होते पुढे काय? अनुभवले!

समाजाने पर्यावरण संवर्धन करणे काळाची गरज आहे: डॉ. संदीप भानोसे

नाशिक (प्रतिनिधी): तीस-पस्तीस वर्षांपूर्वी नाशिकची ओळख थंड हवेचे ठिकाण म्हणून होती. उन्हाळ्यात तापमान 35 डिग्री च्या वर कधी गेलेले आठवत नाही. परंतु यंदा 43 चा आकडा नासिककरांनी अनुभवला. यावर एकच तोडगा आणि तो म्हणजे प्रशासनाने व समाजाने एकत्र येऊन मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करणे आता काळाची गरज बनलेली आहे असे प्रतिपादन वृक्षप्रेमी डॉक्टर संदीप भानोसे यांनी केले.


दिनांक 19 जुलै 24 जुलै रोजी पांडवलेणी येथे सकाळी आठ वाजता प्राध्यापक प्रकाश कोल्हे यांची प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम शाळा तसेच भोसला मिलिटरी स्कूल दोन्ही शाळेचे 65 -65 विद्यार्थी एकूण 130 विद्यार्थी, पर्यावरण जागृती व वृक्षारोपण करण्याकरिता उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धन समितीचे डॉ. संदीप भानोसे, जगबीर सिंग, संतोष रेवगडे उपस्थित होते. तसेच गरुड झेप प्रतिष्ठानचे संकेत भानोसे, अविनाश क्षीरसागर, प्रभाकर जाधव, रेणू भानोसे उपस्थित होते. सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांना देशी झाडाचे महत्व यावर डॉ. भानोसे यांनी मार्गदर्शन केले. तसेच देशभक्तीपर गीत गाऊन, वातावरणामध्ये राष्ट्रभक्ती चे वातावरण निर्माण केले. सर्व विद्यार्थ्यांनी नंतर 2308 सातत्यपूर्ण वाहतूक सुरक्षा व पर्यावरण रक्षा अभियान राबवले. भानोसे सरांनी प्रोग्रेसिव शाळे चे गजानन वैद्य सर व शुभम चिरमाडे सर तसेच भोसला मिलिटरी शाळेचे कर्नल संदीप पुरी, विशाल जोशी सर, विक्रम पवार, सुमित गायकवाड, डॉ मगरे सर व चकोर सर यांचे आभार अभिव्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!