चुंचाळे शिवारात दीड लाखांचा गुटखा जप्त!

नाशिक (प्रतिनिधी): औद्योगिक वसाहतीतील चुंचाळे शिवारात मंगळवारी (दि.७) अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापेमारी केली. घटनास्थळावरून राज्यात बंदी असलेला विविध प्रकारचा पानमसाला आणि सुगंधी तंबाखू असा सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी व्यावसायिकांसह पुरवठादार अशा चार जणांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सतिश राजेंद्र सोनजे व गजानन राणे तसेच सागर बळवंत कोठावदे आणि जावेद अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गुटखा तस्करांची नावे आहेत. त्यातील राणे व जावेद हे पुरवठादार आहेत. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी संदिप तोरणे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
चुंचाळे शिवारातील भोर टाऊनशिप येथील दोन व्यापाºयांच्या घरात गुटख्याचा साठा असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. त्यानुसार सहआयुक्त म.ना.चौधरी व सहाय्यक आयुक्त म.मो.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश दाभाडे, सुवर्णा महाजन व संदिप तोरणे व गोविंदा गायकवाड यांच्या वेगवेगळ््या पथकाने व्यावसायिक सोनजे व कोठावदे यांच्या घरावर छापे टाकले. या कारवाईत सोनजे यांच्या घरात राज्यात विक्रीस असलेला सुमारे एक लाख वीस हजार ८७० रूपये किमतीचा वेगवेगळ््या प्रकारचा पानमसाला व सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला. हा साठा शहरात किरकोळ विक्रीसाठी राणे याने पुरविला असून दुसरा छापा कोठावदे यांच्या घरावर टाकण्यात आला. याठिकाणी सुमारे २६ हजार १५८ रूपये किमतीचा गुटख्याचा साठा एफडीएच्या हाती लागला. हा माल जावेद नामक व्यक्तीने पुरविला असून याप्रकरणी पोलीस दप्तरी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मुगले करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!