एकत्र येऊन तालुक्यातील स्थानिक नेत्यावर विश्वास ठेवा!

इगतपुरी व त्र्यंबकेश्वर सकल आदिवासी समाजाचा भव्य मेळाव्यात माजी आमदार शिवराम झोले यांचे आवहन!

घोटी (प्रतिनिधी): इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सकल आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी सर्व समाजाने एकत्र येऊन आपल्याच तालुक्यातील स्थानिक नेत्याला मदत केली पाहिजे जेणेकरून समाजातील वंचित घटकाला न्याय मिळेल आणि समाजात प्रगती देखील नक्की होईल म्हणून ठाकूर, महादेव कोळी, वारली व भिल या प्रमुख समाजाने मतदार संघातील नेत्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आमदार शिवराम झोले यांनी व्यक्त केले आहे. पहिने येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर माजी सभापती गोपाळ लहांगे, विनायक माळेकर, रवी भोये, पांडुरंग झोले, भाऊराव दगळे, संतोष दगळे, सोमनाथ घारे, देवराम भस्मे, हिरामन कौटे, कैलास घारे, सुरेश भांगरे यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नुकत्याच लोकसभा व विधान परिषदेच्या निवडणुका संपल्या असून आता विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून सर्व पक्षियानी यासाठी कंबर कसल्याचे चित्र समोर येत आहेत. त्यातच सध्या चर्चेत असलेल्या इगतपुरी त्र्यंबककेश्वर विधानसभा मतदार संघात स्थानिक विरुद्ध उपरे ( बाहेरील ) उमेदवार असा कलगीतुरा बघावयास मिळणार आहे या मतदार संघातील आजी माजी सर्वपक्षीय आदिवासी पदाधिकाऱ्यांनी यंदा स्थानिकांना उमेदवारी द्यावी व आमच्यावर बाहेरील आयते उमेदवार लादू नये . बाहेरील उमेदवारांना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांना पाडून बाहेरचे पार्सल परत पाठवू असे सांगत मतदार संघात स्थानिक भूमिपुत्र आढावा बैठक घेतली असून स्थानिक उमेदवारालाच निवडून आणू असा चंग बांधला असून विद्यमान आमदार यांच्यासह माजी आमदार यांनाही विरोध दर्शवला आहे

यावेळी माजी सभापती गोपाळ लहांगे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघात गेल्या वीस वर्षापासून आयात उमेदवार येऊन आपल्या मतानवर राज्य करत आहे आणि आपण मात्र त्यांच्या पाठीमाघे फक्त कार्यकर्ते म्हणून फिरत आहे असे किती दिवस चालणार त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील नेत्यांनी कार्यकर्त्यांनी स्थानिक माणसाला प्राधान्य देऊन हे बाहेरील पार्सल बाहेरच परत पाठवण्याची तयारी करा आणि आपल्या माणसाला एकदा संधी द्या असे मत माजी सभापती लहांगे यांनी व्यक्त केले. त्यामुळे येणारी विधानसभा आता आयात विरुद्ध स्थानिक बघायला मिळण्याचे चित्र जवळपास स्पष्ट होत आहे. दरम्यान इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीमच चित्र आताच स्पष्ट होताना दिसत आहे त्यामुळे स्थानिक व परके अशी लढाई आता स्पष्ट दिसत आहे. दरम्यान पहिने येथे झालेल्या बैठकीत इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघातील सर्व आदिवासी बांधव यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते समाजातील जेष्ठ व विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले असून तालुक्यातील नेत्यांनाच यावेळी संधी द्यावी आणि बाहेरचे पार्सल वेळोवर थांबवले तर तालुक्याचा विकास होईल असे सर्वांनमते ठरावं करण्यात आले.

आयात उमेदवार यांच्यामुळे स्थानिकाची गळचेपी

इगतपुरी तालुका हा नाशिक व मुंबई चे मुख्य प्रवेशद्वार म्हणून राज्यात ओळखला जातो तालुक्यात सर्वाधीक पर्यटन विकसित असून या तालुक्यात पाहिजे तेवढ्या सुविधा मिळत नाही याच प्रमुख कारण फक्त आयात केलेले आमदार आहे कोणी पण येऊन इगतपुरी मतदार संघात उमेदवारी करण्यासाठी आटापिटा करत असत मात्र आता येथील जनता हुशार झाली आहे त्यामुळे आमदार होईल तर स्थानिकच होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!