चांदवड (प्रतिनिधी): मंगरुळ गावाजवळील गुरुद्वाराच्या पाठीमागे शेतात ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरमध्ये अडकून १३ वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. १७) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनसार, परमवीरसिंह अमृतसिंह बेदी (वय १३, रा. साईनगर, चांदवड) असे मृत मुलाचे नाव आहे. मंगरुळ गावाजवळील मंगरुळ-भरवीर रस्त्यालगत बांधकाम सुरू असलेल्या नवीन गुरुद्वाराच्या पाठीमागील शेतात ट्रॅक्टरचा रोटाव्हेटर सुरूअसताना परमवीरसिंह हा ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरमध्ये पाठीमागे बसलेला होता. त्यावेळी अचानक ट्रॅक्टरला झटका बसल्याने तो रोटाव्हेटरमध्ये अडकला. ही घटना ट्रॅक्टर चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने ट्रॅक्टर उभा केला. मात्र तोपर्यंत परमवीरसिंह हा त्यात जास्त अडकल्याने त्याला रोटाव्हेटरमधून काढून नातलगांनी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषीत केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत अधिक तपास चांदवड पोलीस करीत आहेत.

