दादासाहेब गायकवाड सभागृहात आदित्य ठाकरे यांची बुधवारी सभा

नाशिक (प्रतिनिधी) : शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे बुधवारी (दि. २१) नाशिक दौ-यावर येत असून, त्यांची दुपारी चार वाजता दादासाहेब गायकवाड सभागृहात सभा होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली.
आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या नियोजनासाठी पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना, विद्यार्थी सेना तसेच अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाºयांची बैठक शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय शालिमार चौक येथे पार पडली. त्यावेळी बडगुजर बोलत होते. व्यासपीठावर सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, खा.राजाभाऊ वाजे, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गिते, योगेश घोलप, कोर कमेटी सदस्य डी. जी. सूर्यवंशी, लोकसभा समन्वयक निवृत्ती जाधव, उपजिल्हाप्रमुख जगन आगळे, देवानंद बिरारी, सचिन मराठे, केशव पोरजे, युवासेना जिल्हाधिकारी राहुल ताजनपुरे, बालम शिरसाठ, विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे, सुभाष गायधनी, शैलेश सूर्यवंशी, तालुकाप्रमुख राजाभाऊ नाठे, बबन धोगडे, दीपक गायधनी, उत्तम खांडबाहाले यासह शिवसेना पदाधिकारी नीलेश साळुंके, सुनील जाधव, मसूद जिलानी आदी होते.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले घवघवीत यश आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्या या दौºयाला विशेष महत्त्व आहे. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा गुंता, मुख्यमंत्री पदाचा उमेदवार, राज्यातील ढासळलेली कायदा-सुव्यवस्था स्थिती, महायुतीमध्ये सुरू असलेली सुदोपसुंदी, लाडकी बहीण योजना, वाढती महागाई, शेतक-यांचे प्रश्न आदी मुद्द्यांबाबत आदित्य ठाकरे यांची तोफ कशी धडाडते, याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. यावेळी उपस्थितीचे आवाहन सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, खा. राजाभाऊ वाजे, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गिते यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!