नवीन नाशिकात मनपाकडून डेंग्यू, मलेरियासंदर्भात जनजागृती!

नवीन नाशिक (प्रतिनिधी): वैद्यकीय आरोग्य अधिकारी तानाजी चव्हाण, विभागीय अधिकारी सुनीता कुमावत, नितीन रावते, गिरीश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मलेरिया विभाग प्रमुख नदीम पठाण व पेस्ट कन्ट्रोलचे तांत्रिक अधिकारी सचिन रामराजे यांच्या नियंत्रणात परिसरातील विविध प्रभागांमध्ये डेंग्यू डास, अळी तपासणी करण्यात येवून ड्रम, हौद, झाडांच्या कुंड्या, फ्रिज, टेरेस आदींची तपासणी करण्यात येऊन जनजागृतीसाठी माहितीपत्रके व स्टिकर देण्यात येत आहेत.
सध्या सर्वत्र डेंग्यूसदृश व मलेरियाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून, मनपा विभागीय कार्यालयातील मलेरिया विभाग सतर्क झाला आहे. यासाठी जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.
सिडको परिसरात सुरू असलेल्या नवीन बांधकाम परिसरात डास अळी आढळून आल्याने अशा बांधकाम व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन जून व जुलै महिन्यामध्ये एकूण २३ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेत मलेरियाचे अमोल कमोद, प्रमोद भालेराव, सचिन पवार, संदीप ढाकणे, किरण शिंदे, बाळासाहेब मोकळ, मुकेश आहिरे, चंद्रकांत बोंबले, पोपट आहिरे, बबलू शेख आदी कर्मचारी सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!