नाशिक (प्रतिनिधी): विविध कारणांनी आलेल्या नैराश्यामुळे व्यथित झालेल्या चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्समध्ये शनिवारी नोंद झाली. यामध्ये दोन तरुण, एका तरुणीसह एका ज्येष्ठ नागरिकाचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड लिंक रोडवरील संजीवनगर परिसरातील गणेश चौकात राहणाºया विठ्ठल सखाराम कदम (वय ६५) या ज्येष्ठ नागरिकाने शनिवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेतला. दुसरा प्रकार अंबड पोलीस स्टेशनच्याच हद्दीत शनिवारी पुढे आला. सिडकोतील साईबाबा नगरमध्ये राहणारे सागर प्रकाश भदाणे (वय ३३) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दसक परिसरात राहणारे मधुकर कानबाराव खताळ (वय ३८) यांनी शनिवारी दुपारी तीन पूर्वी राहत्या घरात गळफास घेतला. तर भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हुसेनी चौकात राहणाºया अएमन रेहान उस्मानी (वय २२, रा. पिंजारघाट, जुने नाशिक) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी रात्री आठच्या सुमारास पुढे आला.
