जगदिश वाघ,
नाशिक: मनपा कार्यक्षेत्रातील डास प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार किटकजन्य रोग नियंत्रणासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कामकाज करण्याकरता ‘डास नियंत्रण समिती’ची बैठक आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. वैद्यकीय विभागाच्या वतीने जीवशास्त्रज्ञ डॉ. नितीन रावते यांनी विभागाच्या सध्याच्या कामकाजाची, किटकजन्य आजारांची आकडेवारी व त्यावर नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या कार्यवाहीसाठी संबंधित इतर विभागांच्या समन्वयाची आवश्यकता विषद केली. बैठकीस अतिरिक्त आयुक्त (सेवा) स्मिता झगडे, शहर अभियंता तथा भुयारी गटार व पाणी पुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता संजय अग्रवाल, नगररचना विभागाचे कल्पेश पाटील, सहाय्यक संचालक (हिवताप) नाशिक विभागाचे प्रतिनिधी प्रवीण हायलिंगे, जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी रुपाली सुर्यवंशी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे डॉ. आवेश पलोड, शिक्षण अधिकारी शिक्षण विभाग बी. टी. पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण, विभागीय अधिकारी पश्चिम व पंचवटीचे मदन हरिश्चंद्र, विभागीय अधिकारी पुर्वचे राजाराम जाधव, विभागीय अधिकारी ना. रोडचे तुषार आहेर, सिडकोचे विभागीय अधिकारी सुनिता कुमावत, सातपूर विभागीय अधिकारी अंबादास गरकळ, क्रेडाई सहसचिव सचिन बागड व नरेंद्र कुलकर्णी, आयएमए व निमा चे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीमध्ये आयुक्त तथा प्रशासक डॉ. करंजकर यांनी मनपा कार्यक्षेत्रातील डास प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधुन कामकाज करण्याचे तसेच ध्वनी फितीद्वारे जनजागृती करण्याची सूचना दिली. शिक्षण विभागामार्फत सरकारी व खासगी शाळांमध्ये आरोग्य शिक्षण देणे, प्लॉस्टिक बंदी मोहिम राबविण्याविषयी सांगण्यात आले.