गुन्हेगारी विषयी नवीन कायद्यांनुसार नाशिकच्या पंचवटीत दोन गुन्हे दाखल

नाशिक (प्रतिनिधी): देशभरात सोमवार (दि. १) पासून नवीन कायदे लागू झाले आहेत. त्यानुसार, पहिल्याच दिवशी शहर आयुक्तालयातील पंचवटी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात मद्यपी पतीच्या विरोधात पत्नीने तर, मालमत्तेच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाविरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तारवालानगर भागात राहणा-या ४० वर्षीय पिडितेने दिलेल्या तक्रारीनुसार पहिली तक्रार नोंदविण्यात आली. महिला तिचा चहा-नाश्ता विक्रीचा व्यवसाय करते. या व्यवसायातून ती कुटुंबियाचा उदनिर्वाह भागवत असतांना कुठलेही काम धंदा न करणा-या मद्यपी पतीच्या जाचाने ती त्रस्त आहे. सकाळ पासून नशेत व्यस्थ राहणारा पती व्यवसायाच्या ठिकाणी येवून शिवीगाळ करीत पैशांची मागणी करतो. प्रसंगी मारहाण करून घरातील भांडीही विकून टाकतो. त्यास विरोध केल्यावर तो घराबाहेर निघून जा असे सांगतो. तसेच जीवे मारण्याची धमकीही देत असल्याने महिलेने पोलिसात धाव घेतली असून तिच्या तक्रारीची नवीन कायद्यानुसार दखल घेण्यात आली आहे. पिडितेच्या पतीविरोधात नवीन कायद्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुस-या घटनेत तानाजी ढुमणे (वय ६५, रा. माणेकशानगर) यांनी भाऊ शिवाजी ढुमणे (७१) विरुद्ध तक्रार दिली आहे. याप्रकरणी नव्या कायद्यातंर्गत पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालमत्तेवरुन दोघा भावांमध्ये वाद आहेत. मात्र मोठा भाऊ शिवाजी ढुमणे वेळोवेळी कुरापत काढून शिवीगाळ व मारहाण करीत असल्याचे तानाजी ढुमणे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!