जलद न्याय मिळण्याकरीता आजपासून नवीन कायद्यात बदल

फाैजदारी गुन्हयांमध्ये नवीन तरतूदीनुसार हाेणार अंमलबजावणी…

नाशिक (प्रतिनिधी): नवीन फौजदारी कायद्यात १ जुलैपासून बदल केला जाणार आहे. आयपीसी च्या जागी आता भारतीय न्याय संहिता लागू केली जाणार आहे. त्याच प्रमाणे फौजदारी प्रक्रिया संहिता सीआरपीसी च्या जागी भारतीय नागरी संरक्षण संहिता लागु केली जाणार आहे. पुराव्या कायद्याच्या जागी भारती पुरवा कायदा लागू केला जाणार आहे. नविन कायद्याच्या अंमलबजावणीनंतर फौजदारी संहितेतील ३ कलम बदले जाणार अाहे. पुर्वी खुनाच्या गुन्ह्याकरीता लावण्यात येणारे ३०२ कलम आता १०१ ओळखले जाईल. फसवणूकीच्या गुन्ह्यातील ४२० कलम ३१६ म्हणून लागू होईल. खुनाचा प्रयत्न करणे ३०७ कलम अाता १०९ लागू होईल. बलात्काराचे ३७६ कलम ६३ म्हणून ओळखले जाईल. पर्वी अस्तिताव असलेल्या भारतीय दंड संहिता १८६० मध्ये ५११ कलमांचा समावेश होता. आता नवीन भारतीय न्याय संहिता मध्ये ३५८ कलमांचा समावेश करण्यात आला आहे. ज्या मध्ये पुर्वीचे १९ कलमे वगळ्यात आले आहेत. २० नवीन गुन्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच कम्युनिटी सर्विस या नव्या शिक्षेचा अंतर्भाव करण्यात आला आहे. २०२३ मध्ये संघटीत गुन्हेगारी दहशतवाद जमावाने केलेले गुन्हे अदी नवीन गुन्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.

नवीन कलमांचा प्रभावी वापर…
नवीन कायद्यामध्ये प्रामुख्याने गुन्ह्याचे तपासात नवीन तंत्रज्ञान, न्याय वैद्य प्रयोगशाळा अदीचा प्रभावीवापर करण्याबाबात अमुलाग्र बदल करण्यात आला आहे. तपासी अधिकाऱ्याने तपास प्रगीताबाबत फिर्यादीला वेळोवेळी अवगत करणे अंमलदाराला बंधनकारक राहील. पंचनामे करतांना व्हिडीओ रेकाॅर्डींग बंधनकारक आहे. जलद न्याय मिळण्याकरीता नवीन कायद्यात बदल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!