नाशिक (प्रतिनिधी): प्रॉपर्टीच्या वादातून जमावाकडून एका महिलेचा व तिच्या बहिणीचा विनयभंग झाल्याची घटना दि. २८ जून रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये चौघां संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित शोएब गुलाम कोकणी, सलीम गुलाम कोकणी, अजगर मैनुद्दिन कोकणी, सायरा हैदरसाहेब कोकणी (रा. उस्मानिया टॉवर, कोकणीपुरा, भद्रकाली) यांच्याशी प्रॉपर्टीच्या वादावरून बाचाबाची झाली. या भांडणाचे पर्यावसान कोकणी कुटुंबातील चौघांनी संबंधित महिलेला शिवीगाळ केली व महिलेचा चुलत भाऊ शोएब कोकणी व सलीम कोकणी या दोघांनी तिला फायटरने मारहाण करीत तिचा विनयभंग केला. पिडीत महिलेला सोडविण्यासाठी गेलेल्या तिच्या बहिणीलाही अजगर व सलीम यांनी मारहाण केली व विनयभंग केला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रणदिवे तपास करीत आहेत.
Related Posts
दिंडोरी चक्काजाम आंदोलनाला तिसरा दिवस: नाशिकहुन सप्तशृंग गडाकडे जाणारा मार्ग बंद!
कृष्णा पैठणे, वणी (प्रतिनिधी): ऊन्हा-पावसाची तमा न बाळगता वणी मध्ये दुसऱ्या दिवशी आदिवासी बांधवांचा चक्काजाम सुरुच असुन माल व भाजीपाल्याची…
Pin Up Casino”
“Pin Up Casino Azərbaycanda Qanuni Onlayn Oyun Platforması Content Mobil Tətbiq Pin-up Casino Azərbaycan” Mobil Versiya Və Tətbiq: Hansı Daha…
इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघामध्ये शैला झोले यांची एन्ट्री!
विकास शेंडगे, घोटी (प्रतिनिधी): इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघ हा राखीव असल्याकारणाने या मतदारसंघात इच्छुकांची भर पडत आहे आमदार हिरामण खोसकर यांच्यासह…
