नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या आदर्श वाहनचालकांनी ज्यांचे सुरक्षा अभियानचे धडे वाचले व बघितलं असे सुरक्षा नियमांचे वक्ते जागतिक विक्रमवीर डॉक्टर संदीप भानोसे यांच्या कार्यशाळेस प्रतिसाद देत उत्साहात उपस्थिती लावली. यावेळी सातपूर, नाशिक मधील टेक्नोक्रेट उद्योगात वाहतूक सुरक्षा प्रबोधन वर्गाच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी ओके ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक किशोर ओतारी व मोनादीदी यांनी संयोजन केले होते.
वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे ही आता काळाची गरज बनली आहे. चार चाकी चालवताना सीट बेल्ट लावला पाहिजे. दुचाकी चालवताना दोघांनी हेल्मेट घातले पाहिजे. आवेशात येऊन रेस ड्रायव्हिंग टाळले पाहिजे. सिग्नल तोडला नाही पाहिजे. अशा प्रकारे वाहतूक सुरक्षा नियमांचे पालन केले गेले तरच नाशिक एक आदर्श शहर म्हणून ओळखले जाईल. सिग्नल वर रेड लाईट असेल तर आजु बाजूच्या गाड्या जाताय म्हणून आपल्याकडून सिग्नल तोडला गेला नाही पाहिजे, कितीही घाई असली तरी आपल्या थांबण्याने पुढे होणारा अपघात टळू ही शकतो. हीच सकारात्मक मानसिकता व विचारांची बाजू वाहनचालकांनी ध्यानात घेतली पाहिजे. असे प्रतिपादन जागतिक विक्रमवीर डॉक्टर संदीप भानोसे यांनी केले. सुरक्षा नियमांची कार्यशाळा संपन्न झाल्यावर सर्वांनी मिळून वाहतूक सुरक्षा अभियान राबविले.
