तेवीस वर्षांची परंपरा सुरू ठेवत मानाच्या साई पालखीचे घोटी शहरात उत्साहात स्वागत!

विठ्ठल रुख्मिणी ठरले या पालखीचे विशेष आकर्षण…

प्रतिनिधी (घोटी): इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी व मानाची समजली जाणारी गजानन मित्र मंडळ आयोजित घोटी- शिर्डी साईं पालखीचे आज मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले.या साई पालखी प्रस्थानासाठी हुबेहूब वारकरी संप्रदयातील विठ्ठल रुख्मिणी कलाकार खास आकर्षण होते साईनामाने बेफान झालेले साई भक्त, तसेच वाद्यांच्या गजरात अनेक साईभक्त व महिला सहभागी झाल्या होत्या.

गेल्या तेवीस वर्षापासून साई पालखीचि ही परंपरा दिवसेंदिवस मोठ्याउत्साहात पुढे नेली जात आहे. आज सकाळी घोटी येथील महाराणा प्रताप नगर येथे हिरामन कडू यांनी सपत्नीक साई पालखिचि विधिवत पूजन केले, व साई आरती घेऊन घोटी-शिर्डी साई पालखीचे प्रस्थान ठेवले. यावेळी तालुक्यातील व घोटी शहरातील विविध पदाधिकारी उपस्थित होते. महाराणा प्रताप नगर मेनरोड जूना महामार्ग भंडारदरा रोड मार्गे ही पालखी शिर्डीकडे रवाना झाली. यावेळी साई आरतीसाठी शिंगोळे महाराज लगड बाबा, आमदार हिरामन खोसकर, माजी सभापती ज्ञानेश्वर लहाने, माजी उपसभापती भगवान अडॊळे, विठल लंगडे, भगीरथ मराडे, निखिल गोठी, रामदास भोर, अलका जाधव, बाळा गव्हाणे, प्रशांत कडू, नंदलाल भागडे, सचिन तारगे,स्वाती कडू यांच्या हस्ते करण्यात आली.
घोटी शहरातील चौकाचौकात संगीताच्या तालावर, साई बाबाच्या नावाचा जय घोष करत साई पालखीचे स्वागत करण्यात येत होते. ठिकठिकाणी साई पालखी मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. तर अनेक महिला व युवती नाचत बागडत तसेच फुगडी खेळत मार्गक्रमण करीत होते.


घोटी नगरीत साई पालखी प्रस्थान करताना गावातील व तालुक्यातील पदाधिकारी व मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्यांनी पालखीस अभिवादन केले. तसेच घोटी शहराच्या वतीने ग्रामपालिका सरपंच उपसरपंच यांच्यासह सर्वच ग्रामपालिका सदस्यांनी या साई पालखीचे स्वागत केले. यावेळी भाऊसाहेब शेलार, हिरामन कडू, अध्यक्ष कल्पेश भगत, नितीन कडू, गणेश दुभाषे, सोमनात कडवे, रघुनाथ कडू, छोट्या कडू, सुनील भोर, जगणं म्हसणे, मीनानाथ कडू, गणेश भगत, भारत नवले, विनोद कडू, कैलास कडू, योगेश शेलार, माधव नवले, चंदर म्हसने आदी पदाधिकारी व गजाजन मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान शहरातून ही पालखी प्रस्थान होत असताना चौकाचौकात या पालखीचे व साईबांचे अनेक मान्यवरांनी पूजन करुण दर्शन घेतले. घोटी शहरातून या पालखी सोहळ्याची मिरवणूक सुरु होती. या सर्व मिरवणुकीचे व पालखी सोहळयाचे नियोजन मार्गदर्शक हिरामण कडू व ग्रामपालिका सदस्या सौ स्वाती कडू , गजानन मित्र मंडळाचे अध्यक्ष कल्पेश भगत आदी सदस्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!