दुसरा हंगाम आला शेतकरी तरी १ रुपया पीकविम्याच्या प्रतीक्षेत!

१ रुपयात पीकविमा हे शासणाने दाखवलेले गाजरच ; शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र नाठे

प्रभाकर आवारी,

मुकणे (प्रतिनिधी): इगतपुरी तालुक्यातील खरीप हंगामातील मुख्य असणाऱ्या भात पिकाचे गत वर्षी अवकाळीने मोठे नुकसान झाले होते पीकविमा कंपनीने याची अद्यापही दखल घेतली नसुन याबाबत विम्याचा लाभ व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवुन द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
गत वर्षी खरीप हंगामात दरवर्षीप्रमाणे भात पिकाचे अवकाळीने मोठे नुकसान झाले होते याची विमा कंपनीने अद्यापही दखल घेतली नसुन अनेक भातपिकांवर मावा, करपा, तुडतुडे आदी रोगांचा मोठा प्रादूर्भाव झाल्यानेही भातपीकाचे मोठे नुकसान झाले असतांनाच ऐन भात सोंगणीच्या काळातच अवकाळी पावसाने भातपिकाचे अतोनात नुकसान झाले होते.
त्यामुळे लागवड खर्चही निघाला नसुन शेतकरी मोठ्या संकटात आला आहे. कृषी विभागाने व विमा कंपणीने नुकसान झालेल्या भात पिकांची पाहणी केली होती मात्र शासनाकडून मोजक्याच शेतकऱ्यांना तुटपुंजी नुकसान भरपाई दिली गेली मात्र पीकविमा कंपनीने भात लागवडीचा दुसरा हंगाम आला असतांना याची अद्यापही दखल घेतली नसुन शासनाने १ रुपयात पीकविम्याचे गाजर दाखवुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
सदर प्रश्नांची दखल घेऊन पीकविमा कंपणीनेही शेतकऱ्यांचे विमे पास करावे तसेच शासनाकडूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ठोस भरपाई मिळवुन द्यावी अशी मागणी शिवसेनेचे (उबाठा) इगतपुरी तालुकाप्रमुख राजेंद्र नाठे यांनी केली आहे.

पावसाच्या अनियमिततेमुळे इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी संकटात सापडला असुन खरीप हंगामातील भात पिकाच्या विम्यापोटी विमा कंपन्या कोट्यवधी रुपये जमा करतात मात्र अवकाळी पाऊस किंवा इतर रोगराई यामुळे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना विमा कंपनी भरपाई देण्यास टाळाटाळ करीत आहे. गत वर्षी अतोनात नुकसान होऊनही व कृषी विभाग तसेच विमा कंपनीने पंचनामे करूनही शेतकऱ्यांना भरपाई दिली गेली नाही. यामुळे शेतकरी संकटात सापडला असुन विमा कंपनीने शेतकऱ्यांना विम्याच्या रकमा लवकरात लवकर द्याव्या.
– राजेंद्र नाठे
तालुकाप्रमुख शिवसेना, इगतपुरी (उबाठा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!