नाशिक (प्रतिनिधी): सिडको(वा) बिझनेस नेटवर्क इंटरनॅशनल (बीएनआय) ब्लेझ नाशिक चॅप्टर तर्फे गोविंद नगर येथे ग्रँड व्हिझीटर डे आयोजित करण्यात आला होता यावेळी बी एन आय नाशिकचे कार्यकारी संचालक विक्रम माथुर, सल्लागार संचालक सुभाष लागली यांच्यासह 65 आमंत्रित वेगवेगळ्या व्यवसायात कार्यरत असलेले सदस्य उपस्थित होते. 147 व्यापार संदर्भात देवाण घेवाण झाली. आधीच्या आठवड्यात बीएनआय ब्लेझ चॅप्टरमधे 1 कोटी 82 लाखाची उलाढाल झाली. उपस्थित आमंत्रित सदस्य यांनी बीएनआय ब्लेझमधील उत्साही, एकमेकांना मदत करण्याच्या वातावरणाची प्रशंसा केली. तसेच बीएनआय ही एक 39 वर्ष कार्यरत असलेली जागतिक संस्था आहे. याचे 79 देशांत 3 लाख 28 हजारहून अधिक सदस्य आहेत. लघु आणि मध्यम उद्योगांना वाढीसाठी प्रोत्साहन देण्यास बीएनआय प्रयत्नशील आहे. असे यावेळी विक्रम माथुर यांनी सांगितले.
यावेळी बीएनआय ब्लेझचे प्रेसिडेंट अनंत निकम, वाईस प्रेसिडेंट सचिन खराटे, खजिनदार जैमीन पटेल यांच्या नेतृत्वाखाली सौरभ पाटील आणि विशाल देशमुख यांनी ग्रँड व्हिझीटर डे आयोजित करण्यास पुढाकार घेतला. याप्रसंगी बीएनआय ब्लेझचे गौरव एखंडे यांना गोल्डन पिन देण्यात आली. तसेच भूषण वाघ आणि शीतल नवाल यांना चांगल्या कामगिरीसाठी गौरवण्यात आले.कार्यक्रमाचे प्रायोजक्त लाईफशेल हॉस्पिटल कडे होते.
