सटाणा (प्रतिनिधी) : मागील दोन ते तीन वर्षापासून राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यातील १७ संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पेसा भरतीला शासनाने स्थगिती दिलेली आहे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात हा विषय घेऊन यावर आराखडा तयार करून भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी भाजपा आदिवासी मोर्चा चे तालुकाध्यक्ष आकाश साळुंके यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. पालघर जिल्ह्यातील बिगर आदिवासी लोकांनी पेसा भरती विरुध्द मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती तेव्हापासून पेसा झालेल्या परिक्षांच्या निकालाना व संपुर्ण पेसा क्षेत्रातील परीक्षाना स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे आदिवासी सुशिक्षीत बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे तसेच त्यांची कमाल वयोमर्यादा संपुष्टात येत आहे यामुळे आदिवासी समाज बांधवांमध्ये शासनाविषयी असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे १७ संवर्गातील कर्मचाऱ्याची पेसा भरती सुरू न झाल्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये प्रचंड नाराजगी चे वातावरण झाले आहे.
राज्यशासनाने या प्रश्नावर गांभीर्याने विचार करुन पावसाळी अधिवेशनात हा विषय घेऊन राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यात १७ संवर्गातील कर्मचाऱ्यांची पेसा भरती त्वरीत सुरु करून कार्यवाही करण्यात यावी व आदिवासी उमेदवारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चा चे तालुकाध्यक्ष आकाश साळुंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.