आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर स्थानीक विरुद्ध परके सोशल वार

घोटी (प्रतिनिधी): आगामी विधानसभा अगदी काही महिन्यावर होऊ घातली आहे त्या पार्श्वभूमिवर इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघात परके विरुद्ध स्थानिक असा सोशल वार बघायला मिळत आहे त्यातच आता आमदार हिरामन खोसकर यांनी स्थानिक असल्याचा पुरावा सिद्ध केला आहे आणि विशेष म्हणजे जे लोक आरोप करत आहे ते आमदार खोसकर यांचे मामाच आहे आणि स्थानिक नेत्यांनी देखील याला दुजोरा देत आमदर हिरामन खोसकर हे स्थानिक मतदार संघातील आहे असे सांगितले आहे.

यावेळी आमदार हिरामन खोसकर यांनी माध्यमानशी बोलताना सांगितलं की मी गेली अनेक वर्ष इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघात उमेदवारी करत असून पूर्वी मला यश मिळाले नाही मात्र २०१९ मध्ये मला यश मिळाले आणि मी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आडगाव देवळा या गावाचा मूळचा रहिवाशी असून या ठिकाणी आमचे नातेवाईक आमच्या जमिनी जागा आहे तरी देखील मतदार संघातील स्वयंसघोषित नेते मात्र मला बदनाम करण्याचा डाव करत आहे मात्र येथील जनता खंबीर पणे माझ्या पाठीशी उभी आहे आणि आगामी विधानसभा मध्ये मला नक्की यश मिळेल असे आमदार खोसकर यांनी व्यक्त केले. दरम्यान यावेळी पुढे ते म्हणाले की, पूर्वीच्या काळात उदरनिर्वाहासाठी आमचे आजी आजोबा रोजगारासाठी दुसऱ्या गावांना आले होते आणि त्याच ठिकाणी रोजगार मिळाला म्हणजे जिल्हायत त्यांनी रोजगारासाठी गेले होते मात्र दुसऱ्या राज्यात नाही गेलो तरी विरोधाक तेच लावून धरत आहे रोजगारासाठी कोणी कुठे ही जातो मग परके कुठून आले असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. दरम्यान त्र्यंबकेश्वर तालुक्यात माझे चुलते गोपाळा खोसकर हे आडगाव देवळ्याचे सरपंच आहे आदिवासी समाज हा उदरनिर्वाहासाठी स्थलांतर करतो तसे आम्ही देखील आमचे आजोबा देखिव दुसऱ्या गावातून नाशिक मध्ये उदरनिर्वाहासाठी आलो मग यात चूक काय आमची असं मग इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघातुन काही लोक आरोप करत आहे.

आमदार हिरामन खोसकर हे मूळचे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आडगाव देवळा येथील स्थानिक रहिवासी असून त्यांचे चुलते देखील या गावात सरपंच आहे पूर्वीच्या काळात त्यांचे आजोबा यांनी रोजगारासाठी गावातून स्थलांतर केले होते ते देखील नाशिक येथे मग परके कुठून झाले विरोधकांकडे बोलायला जागा नाही म्हणून ते उलट सुलट आरोप करत आहे.

संपत सकाळे (काँग्रेस तालुकाध्यक्ष )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!