घोटी (प्रतिनिधी): धरणीमाता वृक्ष संगोपन फाउंडेशनच्या वतीने इगतपुरी तालुक्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणत वृक्षारोपण केले जाते. तसेच आज आमदार हिरामन खोसकर व भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, भागीरथ मराडे, बाळासाहेब भगत, संजय आरोटे, डॉ महेंद्र शिरसाठ, रामदास भोर यांनी घोटी येथे वनविभागाच्या जागेत वृक्षारोपण केले. यावेळी धारणीमाता फाउंडेशनचे सल्लागार सुधाकर हंडोरे यांनी प्रथमता त्यांचे पूष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला वृक्षावली आम्हा सगे सोयरे या प्रमाणे सयाजी शिंदे यांनी गत वर्षी वृक्ष रोपण केले होते आज पुन्हा धरणीमाता संस्थेने वृक्षरोपण करून राज्यभरात वृक्षलागवडीची मोहीम हाती घेतली आहे. मोठ्या निसर्ग जपणे हाच त्यांचा एकमेव हेतू आहे त्यामुळे राज्यातील प्रत्येक वृक्षप्रेमी त्यांची भेट घेऊन झाडे लावण्यासाठी आपण सर्वांनी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे व यापुढील काळात वृक्षारोपण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सरसावले पाहिजे असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे धरणीमाता वृक्ष संगोपन संस्थेच्या कामाचे त्यांनी मनापासून कौतुक केले.
धरणीमाता ग्रुपने वृक्षरोप लागवड मध्ये आंबा व वडाच्या वृक्षारोपांची लागवड केली असून आंबा, वड हे अशी झाडे आहे की चारचारशे वर्ष जगत असल्याचे नमूद केले. वृक्ष लागवड मोहिमेत घोटीतील धरणीमाता ग्रुपचे भरीव योगदान आहे. यावेळी धरणीमाता ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष संजय देशपांडे, सचिव विनायक शिरसाठ, सल्लागार सुधाकर हंडोरे, सदस्य परशुराम थोरात,संतोष वाकचौरे, दामोदर माळी, गणेश कर भाऊसाहेब आदी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वृक्षरोपण करण्यात विशेष परिश्रम घेतले तर यावेळी जिल्हा महामंत्री शरद कासार, जिल्हा सचिव निखिल हंडोरे, विधानसभा प्रमुख सीमा झोले, रवी गव्हाने, भाऊसाहेब धोंगडे, पल्लवी शिंदे, दीपा रॉय, सुनीता सिंगल, पालसिंग बगड, बाळासाहेब वालझाडे यांच्यासह डॉ असोसिएशन व वनवासी वस्तीगृहातील विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी देखील यावेळी उपस्थित होते.
निसर्ग हा बदलत चालला आहे पावसाल्यात उन्हाळा अशी परिस्थिती बघायला मिळत आहे ऑक्सीजन चा प्रमाण कमी होत चाललेला आहे त्यामुळे आज प्रत्येक घरातील एका नागरिकाने घरासमोर शेतामध्ये वृक्षारोपण केले पाहिजे हे वृक्षारोपण केले तर सर्वच जीवसृष्टीसाठी फायद्याचे आहे त्यामुळे प्रत्येकाने एक झाड लावायलाच पाहिजे
सुधाकर हंडोरे, सल्लागार धरणीमाता फाउंडेशन