नाशिक (प्रतिनिधी): महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र २०२४ मधील दुस-या टप्प्यातील लेखी परीक्षांना शनिवार (दि. २२) पासून प्रारंभ होत आहे. विद्यापीठाच्या विविध पदवी, पदव्युत्तर व विद्यापीठ संचलित अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा राज्यातील एकूण २०७ परीक्षा केंद्रांवर संचलित होणार आहेत.
या परीक्षेत बीडीएस, बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस उर्वरित पदवी अभ्यासक्रमाच्या, तसेच बी.एस्सी. नर्सिंग, बेसिक बी.एस्सी. नर्सिंग, पी.बी. बी.एस्सी. नर्सिंग, बीपीटीएच. बीओटीएच, बीपीओ, बी.ए. एसएलपी., उर्वरित पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एमडीएस, डिप्लोमा डेन्टिस्ट्री, एम.डी, एम.एस. आयुर्वेद अॅण्ड युनानी, डिप्लोमा आयुर्वेद, एम.डी. होमिओपॅथी, एमओटीएच, एम.एस्सी. नर्सिंग, एमपीटीएच, एमपीटी, एम.ए. एसएलपी., एम.एस्सी. (आडिओलॉजी), एम.एस्सी., (एस.एल.पी.), एम.पी.ओ. परीक्षा घेण्यात येणार आहेत. विद्यापीठ संचलित अभ्यासक्रमात एमपीएच, एमपीएच (एन), एमबीए, एम. फिल., बी. आप्टोमेट्री, डिप्लोमा आप्टोमेट्री, आप्थॉल्मिक, डिप्लोमा पॅरामेडिकल, सीसीएमपी, एमएमएसपीसी, पी.जी. डी.एम.एल.टी., बी.पी.एम.टी., एम.एस्सी. फार्मास्युटिकल अभ्यासक्रमाच्या परीक्षा विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी राज्यातील सुमारे ८२,२६७ विद्यार्थी प्रविष्ट होणार असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी स्पष्ट केले.
